। युक्रेन । वृत्तसंस्था ।
युक्रेन – रशियामध्ये गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. या दोन्ही देशांमध्ये काल शांततेत चर्चा पार पडली. रशियाने पाचव्या दिवशी ५६ रॉकेट आणि ११३ क्रूझ क्षेपणास्त्र डागल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. तर, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना आज तातडीने कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे. मिळेत त्या वाहनाने कीव सोडा, असं आवाहन भारतीय दूतावासाने केलं आहे.







