। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पर्यटन व्यवसायिकांच्या अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे 5 वे वार्षिक स्नेहसंमेलन दि.20 एप्रिल रोजी शांत बिच रिसॉर्ट, सासवणे येथे मोठ्या उत्साहात पार पाडले. याप्रसंगी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. तसेच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गुणगौरव करण्यात आला.पर्यटन व्यवसायिकांच्या अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्था पर्यटन वृद्धीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित असेत. स्वच्छता मोहीम, वनीकरण, पर्यटन व्यवसायिकांसाठी कार्यशाळा, पर्यटन जागृती असे विविध उपक्रम राबवून आपले सामाजिक भान दाखवित असते. अशा या संस्थेच्या 5 व्या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एमटीडीसी कोकण विभाग (डीओटी) हनुमंत हेडे, अलिबाग-मांडवा हद्दीचे सहायक पोलीस निरीक्षक राजीव पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्था पर्यटन संस्थेचे अध्यक्ष मनोज घरत, संजीव नाईक, संतोष कामेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष मनोज घरत यांनी पर्यटकांना येत असलेल्या अडीअडचणींविषयी माहिती देऊन त्यासाठी मान्यवरांंना सहकार्य करण्याचे आवाहन केले. माजी अध्यक्ष निमीष परब यांनी संस्थेविषयी माहिती दिली. त्यानंतर संस्थेने 2020-21-22 या वर्षातील दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन तसेच डिप्लोमा, डिग्री व विशेष कोर्स मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. मुलांचे डान्स व गेम्स घेण्यात आले .संस्थेच्या सर्व सदस्यांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या.