। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने पुणे येथे होणार्या 48व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता आपले संघ जाहीर केले. सिद्धीप्रभा फाउंडेशनच्या रुपेश साळुंखेकडे कुमार, तर शिवशक्ती (अ) संघाच्या मानसी पाटीलकडे कुमारी गटाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. गतवेळी आंबेजोगाई-बीड येथे झालेल्या 47 व्या कुमार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबईचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पराभूत झाले होते. यंदा हा संघ काय प्रगती करतो ते लवकर कळेल. निवडण्यात आलेला हा संघ बुधवार दि.4 मे रोजी स्पर्धेकरिता रवाना होईल. निवडण्यात आलेला हा संघ जिल्हा संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी पत्रकाद्वारे प्रसार माध्यमाकरिता जाहीर केला.
निवडण्यात आलेले संघ खालीलप्रमाणे :-
कुमार गट :- 1) रुपेश साळुंखे(संघनायक)-सिद्धीप्रभा फौंडेशन, 2) संतोष ठाकूर, 3) सूरज सुतार-दोन्ही अशोक मंडळ, 4) आकाश केसरकर, 5) यश सायगावकर-दोन्ही जय भारत, 6) तेजस शिंदे, 7) आकाश साळवी- दोन्ही गणेश स्पोर्ट्स, 8) तुषार शिंदे, 9) भावेश महाजन- दोन्ही श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळ, 10) गणेश वाघमोडे-गोलफादेवी मंडळ, 11) वेदांत येरूणकार-विजय क्लब(अ), 12) सोहम नार्वेकर-वारसलेन मंडळ.
प्रशिक्षक :- सुशील ब्रीद.
व्यस्थापक :- मिलिंद कोलते.
कुमारी गट :- 1) मानसी पाटील(संघनायिका) शिवशक्ती संघ (अ), 2) प्राची भादवणकर- शिवशक्ती संघ (अ), 3) रिद्धी हडकर- शिवशक्ती संघ (ब), 4) भारती यादव- विश्वशांती मंडळ, 5) आदिती काविलकर- स्वामी समर्थ महिला संघ, 6) कादंबरी पेडणेकर- जिजामाता महिला संघ, 7) साक्षी सावंत- डॉ.शिरोडकर स्पोर्ट्स, 8) शाल्मली खडपे-अमरहिंद मंडळ, 9) रचना म्हात्रे- गोलफादेवी महिला प्रतिष्ठान, 10) सलोनी नाक्ती – प्रभा भवानी महिला, 11) शिवांजली पवार-भारतमाता स्पोर्ट्स, 12) श्रेया हळदणकर-चंद्रोदय क्रीडा मंडळ.
प्रशिक्षक :- नितीन विचारे.
व्यवस्थापिका :- वैशाली सावंत.