। खरोशी । वार्ताहर ।
सामाजिक कार्यात नेहमी पुढे राहून समाजाप्रती मेहनत घेऊन काम करणार्या अहिल्या महिला मंडळ पेण यांच्या विशेष प्रयत्नाने सांगवड येथे 16 मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
शाळेत जाण्यासाठी मुलींना 6 किलोमीटर चालत जावे लागत असे, ऊन व पावसात अतिशय कष्ट घ्यावे लागायचे. गेली 40 वर्ष याच पद्धतीने किमान दोन-तीन पिढया या त्रासातून गेल्या येथील शालेय मुलींना लवकर पोहचता यावे यासाठी अहिल्या महिला मंडळ उपाध्यक्षा सुलभा सुर्यवंशी यांनी पुढाकार घेऊन थोडा मदतीचा हात देण्याचे ठरविले. मुलींची शाळेसाठी होणारी पायपीट थांबविण्यात हे साहाय्य उपयोगी ठरणार असल्याने सायकल मिळताच मुलींच्या चेहर्यावरील आनंद गगनात मावेनासा पहायला मिळाला. हे मंडळ सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व लोकोपयोगी कार्यात सदैव पुढे असतात.