। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील कोतुर्डे गावात एका महिलेवर विना परवाना आपल्या घरात देशी आणि विदेशी दारू विक्री करताना महाड तालुका पोलिसांनी रंगेहाथ पकडून दारू जप्त केली. या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.निलम नामदेव कदम रा.कोतुर्डे ही महिला आपल्या कोतुर्डे येथील राहत्या घरी विना परवाना दारूची विक्री करत असल्याची माहिती महाड तालुका पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी या महिलेला विक्री करताना रंगेहाथ पकडून 13 देशी आणि 8 विदेशी अशा 21 दारूच्या बाटल्या जप्त केल्या यांची अंदाजे किंमत 1380 इतकी आहे. या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.