। टोकियो । वृत्तसंस्था ।
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची निधन झाल्याची माहिती एनएचके वृत्तवाहिनीच्या हवाल्याने समोर आली आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. भरसभेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
गोळीबारात शिंजो आबे यांना गोळीबारात दोन गोळ्या लागल्याची माहिती आहे. त्यांना छातीत एक गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर त्यांनी उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना अटक केली आहे.







