| खांब-रोहा | वार्ताहर |
रोहे तालुक्यातील संभे गावातील नागरिकांच्या वाढीव नळपाणी पुरवठा योजनेसाठी आ.अनिकेत तटकरे यांच्याकडून 77,49,706 रू.एवढ्या निधीचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र ग्रामस्थांना देण्यात आले आहे.
यावेळी माजी सरपंच संजय सानप,संदेश सानप, सुनील सानप,नारायण कडव,होनाजी सानप, विलास सानप,मंगेश सानप,नाना सानप आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.तर कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे खा.सुनील तटकरे,आ.आदिती तटकरे व युवकांचे प्रेरणास्थान आ.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून सदरचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र खा.सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील गीताबाग नर्सरी निवासस्थानी संपन्न झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात देण्यात आले आहे.
संभे या गावाचा दिवसेंदिवस होत असलेला विस्तार पाहता सद्यस्थितीत चालू असलेला पाणीपुरवठा कमी पडत असल्याची व त्यासाठी नवीन वाढीव नळ पाणी पुरवठ्याची मागणी ग्रामस्थांनी आ. अनिकेत तटकरे यांच्याकडे केली असता त्याची त्वरित दखल घेऊन व त्यासाठी 77,49,706 रुपये एवढा निधी मंजूर केला असून त्याचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते ग्रामस्थांना देण्यात आले आहे. तसेच गरजेच्या वेळी खा.सुनील तटकरे व आ.आदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांनी मोलाचे सहकार्य केले असता संभे ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.