। उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उरण येथील कार्यालयाचे व गुह संकुलाचे उद्घाटन मनोजकुमार बोधे यांच्या हस्ते बुधवारी दि10 करण्यात आले. तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या व गुह संकुलाच्या इमारतीची दुरावस्था झाली होती. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून या नव्या कार्यालयाच्या व गुह संकुलाच्या इमारतीचे बांधकाम हाती घेतले होते. यावेळी उरण कार्यालयाचे उप अभियंता रविंद्र चौधरी, जयकुमार बोके, विजय शेंगाड, उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, शहराध्यक्ष कौशिक शहा, राजेश ठाकूर, चेतन गायकवाड, मोहन काटे, वसुंधरा पाटील, बाळकृष्ण पाटील, येडवट डिसोझा सह इतर मान्यवर उपस्थित होते.