। खोपोली । वार्ताहर ।
वडिलोपार्जित जमिनीचा हक्क मिळण्याच्या वादातून लोहप गावात कुटुंबातच हाणामारी झाल्याची घटना घडली. सुधीर रमेश शेलार कुटुंबातील सदस्यांनी वडिलोपार्जित जमिनीत हक्क मिळविण्यासाठी आपल्या वकीलामार्फत नोटीस पाठविली होती. याचा मनात राग धरून ज्ञानेश्वर हिरु पाटील, राजेश पाटील, सागर ठाकूर यांनी सुधीर शेलारांकडे विचारणा करीत तू नोटीस का पाठविलीस? तुमची हिंम्मत कशी झाली अशी विचारणा करीत शिवीगाळ करीत लोखंडी रॉड व दांडक्यांनी मारहाण करीत त्यांना रक्तबंबाळ केले. तसेच त्यांच्या दुकानातील काही सामानाची नासधूस केली. या हाणामारीत शेलार जबर जखमी झाले. तक्रारीवरुन पोलिसांनी तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारे आरोपी फरार झाले असून रसायनी पोलीस त्याचा तपास करीत आहेत.