• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

अंधःकार दूर व्हावा

Varsha Mehata by Varsha Mehata
October 23, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एकेकाळी बहुसंख्य लोकांच्या जीवनात रेशन दुकान या संस्थेला फार महत्व होतं. गॅस मिळत नसे. त्यामुळे रॉकेलवरच अवलंबून राहावं लागे. खुल्या बाजारातली साखर भयंकर महाग असे किंवा मिळतच नसे. त्यामुळे या जिनसांसाठी रेशनचा रस्ता धरावा लागे. दिवाळी वगैरे सणांच्या काळात साखर, रॉकेल इतकंच काय रवा, मैदा यांचासुद्धा काळाबाजार होई. हा जमाना गेला. रॉकेल हद्दपार झालं. साखर सहज मिळते. शिवाय बराच काळ तिचे दर स्थिर आहेत. आता रेशन दुकानांवरची गर्दी कमी झाली. टंचाई हा शब्दही नामशेष झाला. समाज म्हणून आपण आता खूपच पुढे आलो. देशात पंचवीस ते पस्तीस कोटी लोक मध्यम वर्गात आहेत. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि इटली यांच्या एकत्रित लोकसंख्येहूनही ही संख्या अधिक आहे. या लोकांना महिन्याला ठराविक उत्पन्नाची हमी आहे. आज ते पैसे देऊन मनाला येईल त्या वस्तू खरेदी करू शकतात. ताणतणाव आणि अडचणी आहेतच. पण तरीही यांचं आयुष्य सुखवस्तू आहे. दिवाळीसारखे सण म्हणजे तर सुखवस्तू आयुष्यातही आणखी मौजमजा करण्याचे. ती करण्यासाठी बाजारपेठ त्यांना तर्‍हतर्‍हेची साधनं पुरवते. इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तू, मनोरंजनाचे नवीन प्रकार. गेली दोन वर्षे काहीशी उदासीत गेली. कोरोना गरीब-श्रीमंत असा भेद करीत नसल्याने सर्वांचेच हाल झाले. पैसे आहेत पण ऑक्सिजन नाही किंवा इस्पितळात जागा नाही अशी स्थिती आली. जुन्या काळातल्या रेशन व्यवस्थेची आठवण करून देणारा तो प्रकार होता. शिवाय, तिथे साखरेशिवाय माणसाचा जीव जात नव्हता. इथं तसं नव्हतं. असो. मौजमजेकडे पुन्हा परतायला हरकत नाही असा काळ आला. त्या काळातली पहिली दिवाळी आली. बाजारात पुन्हा झगमगाट वाढला. वर्दळ वाढली. पण खरोखर खरेदी किती व कशाची वाढली हे पाहावं लागेल. अलिकडेच प्रसिध्द झालेल्या आकडेवारीनुसार अत्यंत महागड्या कार्सची विक्री जितकी वाढली आहे तितक्या प्रमाणात छोट्या मोटारींची किंवा दुचाकींची विक्री वाढलेली नाही. म्हणजे वरच्या स्तरातील सुखवस्तूंची आणखी मौजमजा करण्याची क्षमता शाबूत आहे. त्या मानाने खालच्या सुखवस्तू लोकांची ती नसावी. पण ते थोडीफार दिवाळी करतीलच. खरी अडचण दुसर्‍या एका वर्गाची आहे. त्यांचं उत्पन्न स्थिर नसतं. यात शेतकरी येतात तसंच स्वयंरोजगार किंवा छोटे उद्योग चालवणारे लोक येतात. यंदा यांची हालत थोडी कठीण आहे. कोरोनापासूनच्या मंदीमुळे अनेक छोटे उद्योग बंद आहेत. आणि शेतीचे हाल तर सर्वांसमोर आहेत. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला कपाशी आणि सोयाबीन ही दोन पिकं सोन्यासारखं उत्पन्न मिळवून देतील अशी आशा होती. पण परतीच्या पावसाने त्या आशेची माती केली. कालपर्यंत दिवाळीच्या बाजारपेठेत येऊ शकेल अशा अवस्थेतला शेतकरी आज बिगर-सुखवस्तू होऊन या पेठेच्या बाहेर फेकला गेला आहे. देशाच्या नाही पण निदान महाराष्ट्रातल्या दिवाळीवर तरी हा मोठा ओरखडा आहे. सुखवस्तूंची जबाबदारी अशी की त्यांनी आपल्या भावांची आठवण ठेवावी, त्यांना होता होईल ती मदत करावी. या निमित्ताने बदललेल्या हवामानाबाबतही चर्चा व्हायला हवीय. कारण यंदा अति-पावसानंच दिवाळीमध्ये मिठाचा खडा टाकलाय. गेल्या काही वर्षांपासून बिगरमोसमी आणि एका वेळी एखाद्या ठिकाणी ढगफुटीसारखा कोसळणारा पाऊस हा प्रकार वाढू लागलाय. आकाशात बसलेला देव हे काहीतरी घडवतो आहे असं म्हणून आपल्याला स्वस्थ बसण्यासारखं नाही. आपला निसर्ग, आपलं पर्यावरण आपणच घडवत असतो. अंतिमतः आपल्या छोट्या छोट्या सवयींचाच या पर्यावरणावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. पाण्याची बचत करणे, जमेल तितकी झाडे लावणे किंवा प्लास्टिकचा वापर टाळणे यासारख्या गोष्टीदेखील आपलं भावी पर्यावरण घडवण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. आपली मुलं दिवाळी आनंदानं साजरी करू शकतील की नाही हे त्यावरच अवलंबून असेल. हवेच्या प्रदूषणाइतकंच समाजातलं गैरविचारांचं आणि अंधश्रध्दांचं प्रदूषणही भयंकर वाढतंय. एकेकाळी फटाके लावू नका असं आवाहन सहज करता येऊ शकत होतं. आज अशा आवाहनाला धर्माच्या नावाने विरोध केला जातो. यंदाच्या दिवाळीत असे अनेक अंधःकार नाहीसे व्हावेत या शुभेच्छा.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दुःखाचाच शिधा; फक्त सहा तालुक्यात साडे अकरा हजार वितरण

Next Post

लक्ष दीप विरघळता गात्री…

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

लक्ष दीप विरघळता गात्री...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?