| पेझारी | वार्ताहर |
कुर्डूस विभागातील शेकापचे जेष्ठ कार्यकर्ते, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी विश्वनाथ पोसू पिंगळे यांचे रविवारी (दि.13) निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 75 वर्षे होते. कुर्डुस हायस्कूल माजी सभापती, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत पोसू पिंगळे यांचे ते कनिष्ठ बंधू तसेच शेकाप कार्यकर्ते सुनील पिंगळे यांचे चुलत बंधू होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे श्री. धनंजय पिंगळे, सुहास(राजू) पिंगळे तसेच मुलगी स्मिता यशवंत कुथे, सूना, जावई, नातवंडे, नातजावई, पुतणे असा मोठा परिवार आहे. कुर्डूस तंटामुक्तीचे ते अध्यक्ष होते. उत्तरकार्य (दि.24) कुर्डूस येथील राहत्या घरी होणार आहेत.