पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
। उरण । वार्ताहर ।
उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणेने सध्या दारू विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला नाही. त्याचा फायदा उठवत थर्टी फर्स्ट मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी उरण, जेएनपीए बंदरातील हाँटेल, ढाबा, टपरीधारक, चायनीज सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा करण्यास व्यवसायिकांनी सुरुवात केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.अशा बनावट दारूमुळे शासनाचा लाखो रुपयाचा कर बुडणार असून सदर दारूच्या सेवनामुळे तेलीराम बरोबर युवकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी भिंती जनमानसात व्यक्त केली जात आहे.
नवीमुंबई पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हे उरण, जेएनपीए बंदरातील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारतांना दिसत नाहीत.त्यामुळे दारु विक्रेत्यांना त्यांचा धाक राहीला नाही.त्यामुळे अवैध धंद्याची संख्या बळावली आहे.याचा फायदा उठवत उरण, जेएनपीए बंदर परिसरातील हाँटेल, ढाबा, टपरीधारक, चायनीज सेंटर तसेच पार्किंग वर सर्रासपणे शासनाचा लाखो रुपयाचा कर बुडवून रात्री अपरात्री खुलेआम व्यवसायीक दारु बरोबर अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.त्यात काही दारु विक्रेते हे पैशांच्या लोभापायी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून दारु मध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करत आहेत.ही भेसळयुक्त व बनावट दारू पिल्याने अनेकांना शारीरिक, मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे.
यावर्षी थर्टी फर्स्ट हा जून्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाच स्वागत करण्याचा महत्त्वाचा दिवस शनिवारी ( दि३१) येत असल्याने उरण, जेएनपीए बंदर परिसरातील हाँटेल, ढाबा, टपरीधारक,चायनीज सेंटर आणि पार्किंग मध्ये मोठ्या प्रमाणात दारु विक्रेत्यांनी शासनाचा लाखो रुपयाचा कर बुडवून भेसळयुक्त व बनावट दारू जमवाजमव करण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.अशा भेसळयुक्त व बनावट दारूच्या सेवनामुळे या अगोदर अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. यावर्षीच्या थर्टी फर्स्ट मध्ये बनावट दारु सेवनामुळे तेलीराम, कंटेनर ट्रेलर चालक तसेच युवा पिढीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.तरी नवीमुंबई पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एखादी दुदैवी घटना घडण्याची वाट न पाहता दारु विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी चक्क महिला भगिनी व्यक्त करत आहेत.







