। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
हातखंबा रस्त्यावरील कुवारबाव येथे एसटीला धडक देणार्या दुचाकीचालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची घटना मंगळवारी (दि.24) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली होती. संतोष तातोबा माने (39) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
संतोष माने हा मंगळवारी रात्रीच्या सुमारास दुचाकी घेवून कुवारबाव येथून जात होता. यावेळी राजापूर-रत्नागिरी बस ही रत्नागिरीच्या दिशेने येत असताना कुवारबाव येथे दुचाकीने समोरुन जोराची धडक दिली. यात दुचाकीचालक संतोष माने याला दुखापत झाली. तसेच, बसच्या समोरील भागाचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.