वडगाव शाळेचा स्तुत्य उपक्रम

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

सरत्या वर्षाला अभिवादन व नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी राजिप वडगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी सायंकाळी एकत्र येत विविध महापुरुषांची वेषभुषाकरुन तसेच महाराष्ट्रातील विविध धर्माचे वेश आणी फॅन्सी ड्रेस परिधान करुन उपस्थित मान्यवरांची मने जिंकली आहेत. यावेळी प्रत्येक विद्यार्थीने वाघ, शिकारी, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, कोळी, आदिवासी, भूत अशा विविध वेशभूषा साकरल्या होत्या. मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या या अफलातून संकल्पतून व पालकवर्गातून हा उपक्रम हाती घेण्यांत आला होता.

Exit mobile version