| दापोली | प्रतिनिधी |
दापोलीत दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी (दि. 26) रोजी पहाटे 6 वाजता तालुक्यातील वानोशी तर्फे नातू येथील चव्हाण यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा कोसळला. या गोठ्यात एकूण सहा जनावरे होती. त्या पैकी एक गाय दगावल्याची घटना घडली आहे. तर पाच जनावरे ही जखमी झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस पाटील चव्हाण यांनी तातडीने जेसीबी आणि त्यांचे मजूर आणि गावकऱ्यांच्या मदतीने अन्य जनावरांना वाचविले आहे. या बाबतची माहिती स्थानिक तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. त्यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेत चव्हाण यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जनावरांची वैरण पावसात भिजली आहे.