बुद्धपौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात अभयारण्याची सफर

कर्नाळामध्ये वन्यप्रेमीना निसर्गाअनुभव

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

वैशाखी पौर्णिमा म्हणजे निसर्ग, पशु, पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. आकाशात शुभ्र चांदण्या आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात जंगलामध्ये वावरणार्‍या पशु, पक्ष्यांना याचि देही पाहण्याचा हा दिवस असतो. दरवर्षी बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधत वनविभागातर्फे पशु, पक्ष्यांची गनणा करण्याची मोहीम आखली जाते. शुक्रवारी कर्नाळा अभयारण्यातही असाच निसर्गानुभव तमाम वन्यप्रेमींना आला. शुभ्र चांदण्याच्या प्रकाशात मचाणावर ठाण मांडून अनेक पशु, पक्षी पाहण्याचा योग सहभागी झालेल्यांना आला.

कर्नाळा पक्षी अभयारण्यात आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग अनुभव कार्यक्रमात वन विभागाच्या कर्मचार्‍यांसोबत उरण परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या दोन संस्थाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. अभयारण्यात तयार करण्यात मंचनावर बसून पाणवठ्यावर आलेल्या पशु पक्ष्यांच्या हालचालींची नोंद करण्याचा अनुभव या वेळी उपस्थितानी घेतला आहे. देश भरातील अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी गणना करण्यात येत असते.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्र प्रकाशाचे प्रमाण जास्त असल्याने दरवर्षी पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणणेचे आयोजन करण्यात येत असते. अनेक वर्षा पासून गणनेच्या सुरु असलेल्या या प्रक्रियेला शास्त्रीय पुरावा नसल्याने आता या प्रक्रियेला निसर्गअनुभव नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमा करता अभयाराण्यातील पाणवठ्यावर मंचान तयार करून पाणवट्यावर येणार्‍या प्राण्यांची प्रगणणा आणि पाऊल खुणा या वरून प्राण्यांच्या संख्येची गणना करण्यात येत असते. निसर्ग अनुभवाचा हा दिवस प्राणी प्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांसाठी पार्वणीचा दिवस ठरत असल्याने देशभरातील आरण्यात आयोजित कार्यक्रमात असंख्य प्राणी प्रेमी आणि अभ्यासक भाग घेत असतात. कर्नाळा पक्षी अभय अरण्यात शुक्रवारी ( ता.5) दुपारी 3 ते शनिवारी ( ता.6) सकाळी 8 पर्यत आयोजित कार्यक्रमात उरण वेश्‍वी येथील केयर ऑफ नेचर संस्थेच्या दोन सदस्यांनी तक चिरनेर उरण येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या दोन सदस्यांनी सहभाग नोंदवल्याची माहिती कर्नाळा वन विभागाचे वन क्षेत्रपाल नारायण राठोड यांनी दिली आहे. राठोड यांनी दिलेल्या माहिती नुसार या वेळी कर्नाळा पक्षी अभय आरण्यात रान डुक्कर, विविध प्रजातीची वानर, माकड आणि पशु पक्षांची नोंद करण्यात आली असून, रानडुकराच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

Exit mobile version