| नेरळ । वार्ताहर ।
कशेले खांडस रस्त्यावर कशेले ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पेन प्रोजन फुड्स या कंपनीतून येणार्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशी आणि रस्त्याने येणारे जाणारे वाहन चालक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर बॉयलर चिकनवर प्रक्रिया करून ते मांस येथून बाहेर पाठवले जात असल्याने निर्माण होत असलेल्या दुर्गंधी बद्दल येथील स्थानिकांनी आवाज उठवला आहे.
कशेळे ग्रामपंचायत हद्दीत पेन फ्रोजन फुडस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही बॉयलर चिकन एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे. कशेले ते खांडस या रस्त्यावर ही कंपनी असून तेथे ओल्या चिकनचे वेगेवगेळे प्रोडक्ट तयार करून पार्सल द्वारे पाठवले जात असतात. त्याच चिकन फ्रॉक्टरी या कंपनीमधून मागील काही महिन्यांपासून सतत प्रचंड दुर्गंधी युक्त वास बाहेर येत असून ही दुर्गंधी सध्याच्या उन्हाळ्यात वातावरणात असलेल्या हवेमुळे परिसरात पसरत असते. ही दुर्गंधयुक्त वास परिसरातील किमान पाच किलोमीटर परिसरात स्थानिक ग्रामस्थांना सहन करावी लागत आहे.
या कंपनीला लागूनच अॅकेडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स संस्थेचे ज्ञानानुभव विद्यालय प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा विद्यालय असून काही अंतरावर लहान मुलांची ऑरचीट गोबल ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. त्या दोन्ही ठिकाणी विद्यार्थांना तसेच शिक्षकांना चिकनपासून निर्माण होणार्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीतून बाहेर पडणार्या दुर्गंधीयुक्त वासाचा प्रचंड प्रमाणत त्रास होत आहे.त्या ठिकाणी रस्त्याने प्रवास करणारे वाहनचालक यांना देखील या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून त्या परिसरात असलेल्या आदिवासी वाड्यांमधील आदिवासी लोकांना पोटात मळमळ आणि उलट्या होण्याचे त्रास जाणवू लागले आहेत. त्यामुळे स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी पेन प्रोझेन कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.