‘मन बरसे’चे अलिबागकरांवर गारुड

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग येथील कलाकारांनी मिळून रसिक प्रेक्षकांसाठी नवीन रोमँटिक म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. या व्हिडिओला सर्वत्र पसंती मिळत असून, या टीमचे कौतुक केले जात आहे. या गीतातील ओळी श्रावणातल्या सरीप्रमाणे मनाला भिजवून प्रत्येकाला हिरव्यागार रानात बागडण्याचा आभास देत आहे.

या व्हिडिओचे गीत/संगीत/व्हिडीओ दिग्दर्शन मनिष अनसुरकर आहेत. यामध्ये मधुरा देशपांडे आणि अनुराग गोडबोले यांनी आपल्या सुमधूर आवाजाने या गाण्याची लज्जत वाढवली आहे. सारा जुईकर आणि ऋषिकेश ठोसर या कलाकारांनी यात प्रमुख भूमिका निभावली आहे. तर सुनीत गुरव, संदीप वाटवे यांनी छायाचित्रण केले आहे. संकलन कर्तव्य मोकल यांचे आहे. सहछायाचित्रण सुशांत नाईक आणि विक्रांत मुंबईकर यांनी केले आहे.

मेकप आर्टीस्ट कांचन पाटील, प्रतिज्ञा पाटील, संपदा पोंगडे या आहेत. अमित पाटील, शुभम म्हात्रे, सौरभ गुरव यांनी निर्मिती केली आहे. या व्हिडिओची यू ट्युब लिंक https://www.youtube.com/watch?v=coa5V6fd5qw नुकताच प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. आणि सर्वत्र या टीमचे कौतुक केले जात आहे. या यू ट्यूब लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पाहून आपली प्रतिक्रिया देण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version