। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा येथील जेएमएम एज्युकेशन सोसायटीतर्फे अंजुमन हायस्कूलच्या प्रांगणात शनिवार 11 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजता शांती संमेलन व बंधुता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
समाजातील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी व नविन पिढी घडविण्यासाठी आपणा सर्वांनी एकत्र येवून विचार विनिमय करण्याची नितांत आवश्यकता असून या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे नाझिम चोगले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला तहसीलदार सचिन खाडे, पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, नगर पंचायत नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, हिंदू समाज तालुका अध्यक्ष समीर बनकर प्रमुख पाहुणे म्हणून तर नंदू गोविलकर, महादेव पाटील, करण गायकवाड, महेंद्र ढवळे, रणजित जैन, चंद्रकांत पवार, रमेश कानये, अनंत नाक्ती, देवजी गाणेकर, अनिल बसवत, सुरेश जाधव, यशवंत पवार, सुरेश महाडिक, वेदिका पाखड, जयदास भायदे, स्वेता लटके, राजेश्री कांबळे, बाबू शिर्के, अशोक काते, सुरेश कुडेकर, हिरामण चव्हाण, सौजन्या पोटले, कोमल वेटकोळी, वनिता खोत, अनंत येलवे, पांडुरंग बने मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी धार्मिक अभ्यासक कलीम मोहम्मदी, धार्मिक स्कॉलर अब्दुल मुईद मदनी, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर टेकले प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडणार आहेत. सोहळ्याला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जेएमएम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाझीम चोगले, सचिव साजिद हुर्जूक यांनी कळविले आहे.