मुंबईतील क्रिकेट प्रेमींचा विक्रम

विश्वचषक विशेष एक्सप्रेस फुल्ल


| मुंबई | वृत्तसंस्था |

विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी अहमदाबाद जाणाऱ्या क्रिकेट प्रेमींची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष गाडी चालविण्याची घोषणा केली आहे. मात्र, गुरुवारी पहिल्या क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेनची सर्व तिकिटे अवघ्या 17 मिनिटांत आरक्षित झाली आहे. त्यामुळे मुंबईतील क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेनची घोषणा पश्चिम रेल्वेने केली आहे.

पहिल्या विश्वचषक स्पेशल ट्रेनची तिकिट आरक्षण गुरुवारी सकाळी सुरु झाले होते. मात्र, अवघ्या 17 मिनिटांत ट्रेन क्रमांक 09013 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद स्पेशल ट्रेनचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले होते. प्रतीक्षा यादीही 200 पुढे गेली होती. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
पहिल्या विश्वचषक स्पेशल ट्रेनला प्रवाशांचा प्रतिसाद बघता पश्चिम रेल्वेने दुसऱ्या विश्वचषक स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. या ट्रेनची क्षमता 1531 आसनांची आहे. स्पेशल ट्रेनच्या तुलनेत 299 जागांची लक्षणीय वाढ आहे.

Exit mobile version