पुणेरी पलटणचा दणदणीत विजय

| जयपूर | वृत्तसंस्था |

पुणेरी पलटण संघाने शुक्रवारी प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमातील दहाव्या विजयाला गवसणी घातली. पुण्याने गुजरात जायंटस्‌‍ संघावर 37-17 असा दणदणीत विजय मिळवला. पुण्याने 11 लढतींमधून दहा विजय मिळवत 51 गुणांची कमाई करीत गुणतक्क्यातील पहिले स्थान कायम राखले आहे. गुजरातचा पाचवा पराभव झाला. अस्लम मुस्तफाच्या अष्टपैलू खेळामुळे पुण्याचा विजय सुकर झाला. गौरव खत्री व मोहमद्रेझा चियानेह यांनी ही चमकदार कामगिरी केली.

Exit mobile version