| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माले जवळील फराटपाडा गावातील शेतकऱ्यांनी भाजीपाला शेती करताना अनेक आंतरपिके घेतली आहेत. यात प्रामुख्याने हॉटेल्समध्ये मोठी मागणी असलेले डांगर भाजीचे शेती केली आहे. या शेतीमधून तब्बल ते सात किलो वजनाचे डांगर पिकवले आहेत. कृषी खात्याचे मार्गदर्शन घेऊन शेतकरी नितीन फराट हे शेती करीत असतात.
पदवीधर तरुण असलेले नितीन फराट यांच्याकडून गेली अनेकवर्षे भाताची दुबार शेती केली जाते. त्या भागात असलेल्या पाझर तलावातून येणारे पाणी यांचा वापर सिंचनासाठी केला जात आहे. त्या पाण्याच्या आधारे वेगवेगळी प्रकारची शेती करणारे हे कुटुंब आता आंतरपीक भाजीपाला शेतीकडे वळले आहे. तेथे पाझर तलावातून येणारे पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यात त्या भागात पिकवला जाणारा गावठी भाजीपाला याला चांगली बाजारपेठ उपलब्ध असून, या शेतकऱ्यांनी शेतात शेणखताचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फायदा शेतीमधून तयार होणारा भाजीपाला, पाले भाज्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होत आहे. त्यासाठी नितीन यांनी आपल्या जमिनीत वेगवेगळे प्रकारची पिके घेण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व प्रकारचा भाजीपाला यांच्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जात आहे. त्याचा फायदा भाजीपाला पिक बाजारात नेल्यावर चांगला भाव मिळत असतो. त्यांनी 30 गुंठे जमिनीमध्ये केलेल्या या शेतीमध्ये लावलेल्या वेलीवर डांगर लगडले आहेत. त्यातील एका डांगर यांचे वजन हे सहा ते सात किलोपर्यंत भरले जात आहे. त्यांना कृषी विभागाचे सहायक पर्यवेक्षक किरण गंगावणे यांचे महत्वाचे मार्गदर्शन मिळत आहे.







