सुधागडात पोलिसांना दिले निवेदन

। पाली । वार्ताहर ।

बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली. शिवसेना पक्षाच्यावतीने पाली शहरात जाहीर निषेध व्यक्त करत सुधागड-पाली नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर अडसुळे तसेच पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांना निषेधाचे निवेदन शिवसेनेच्या सुधागड तालुका महिला संघटिका रेश्मा सुरावकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू पाटील, जिल्हा उपसंघटक राजेंद्र राऊत, महिला जिल्हा उपसंपर्कप्रमुख अश्‍विनी रुईकर, सचिन डोबल, दिनेश चीले विद्देश आचार्य, रमेश सुतार, किशोर दिघे, सुरज गुप्ता, नेत्रा पालांडे, वृषाली खरीवले, अंतरा यादव, विभाग प्रमुख एकनाथ हलदे, किशोर चौधरी, आदी उपस्थित होते. बदलापूर घटनेत प्रत्यक्ष कृत्य करणारा शाळेचा कर्मचारी याला पोस्को आणि अन्य कायद्याअंतर्गत फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी. त्या कर्मचार्‍याला संरक्षण देणार्‍या संस्थाचालक मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला या विरोधात तीव्र आंदोलन उभाराव लागेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version