बेलापूर-शहाबाज गावात तीन मजली इमारत कोसळली

दोघांचा मृत्यू, तर काही जण दबल्याची शक्यता

| नवी मुंबई | वृत्तसंस्था |

नवी मुंबई शहरातील बेलापूर विभागात शहाबाज गावात आज पहाटे 5 वाजताच्या दरम्यान इंदिरा निवास ही बेकायदा अनधिकृत इमारत कोसळली आहे. सदर दुर्घटनेत 52 जण सुखरूप बाहेर पडले असून दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिका व एनडीआरएफच्या मदतीने रात्री पाच वाजल्यापासूनच या ठिकाणी पडलेल्या इमारतीचा मलबाबाहेर काढण्याचे रेस्न्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिली. इमारत कोसळण्यापूर्वी इमारतीला हादरे बसत असल्याने घाबरलेले नागरिक इमारती बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. दुर्घटनेत बाहेर काढण्यात आलेल्या सर्व जणांना नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर विभागातील रात्र निवारा शिबिरात हलवण्यात आले आहे. मलब्याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आल्यामुळे या ठिकाणी रेस्न्यू ऑपरेशन सुरूच असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल यांनी दिली. ही 10 वर्षे जुनी इमारत होती. त्यामुळे या दुर्घटनेत जो दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असंही आयुक्त म्हणाले.

Exit mobile version