| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक संघ, पनवेलतर्फे अनोखा उपक्रम संघातर्फे नुकताच सादर करण्यात आला. तो कार्यक्रम म्हणजे डॉ.शशिकांत कामत पुरस्कृत सूर बहार:सुनहरी यादोंकी महफिल. या कार्यक्रमात विविध नामांकित हॉस्पिटल्समधील डॉक्टर्सनी तो सादर केला. यामध्ये डॉ.शशिकांत कामत, डॉ.पूजा बांदेकर, डॉ.नम्रता जोशी ,डॉ.सुदेश रे, डॉ.विपुल, संकपाळ हे डॉक्टर्स सहभागी झाले होते. डॉ.विनिता कामत यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन केले. ए मेरी जोहरा जबी सारखी अजरामर गाणी या डॉक्टर्स मंडळींनी साभिनय सादर करुन प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळविली.
सर्व डॉक्टर्स कलाकारांचा संघाचे अध्यक्ष जयवंत गुर्जर, उपाध्यक्षा माधुरी गोसावी, सचिव सुनिल खेडेकर, माजी अध्यक्ष नंदकुमार जोशी यांचे हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट व दर्जेदार झाल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाचे नियोजन सचिव सुनिल खेडेकर, सह सचिव भास्कर चव्हाण यांनी केले. अध्यक्ष जयवंत गुजर यांनी आभार प्रदर्शन केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.