| मुंबई | प्रतिनिधी |
सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी (दि.8) रोजी झालेल्या अपघातात रशीद सुलतान शेख या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात दुचाकी चालक धवल वैदय याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री धवल हा दुचाकीने मेट्रो सिनेमाहून महापालिका मार्गे सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने भरधाव वेगात येत होता. त्यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या दुचाकीने रशीद शेख यांना धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या रशीदला उपचारासाठी जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रशीदचा मृत्यू झाला. या प्रकरणी आझद मैदान पोलिस ठाण्यात धवल वैद्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात धवलही जखमी झाला असून, त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.