गोवे ग्रामपंचायतीने केले आरतीचे कन्यादान

| कोलाड | वार्ताहर |

गोवे ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र पोटफोडे यांच्या संकल्पनेतून, तसेच सर्व सदस्यांच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या वरदा सुनील तटकरे कन्यादान योजनेतंर्गत गोवे आदिवासीवाडी येथील आरती लहू वाघमारे हिचे गोवे ग्रामपंचायतीच्या वतीने कन्यादान करण्यात आले आहे.

यावेळी माजी सरपंच सुप्रिया जाधव, माजी उपसरपंच नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पवार, युवा नेते लहू पिपळकर, रंजिता जाधव, अंजली पिंपळकर, निशा जवके, ग्रामसेवक गोविंद शिद, मयुरी जाधव आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

गोवे आदिवासी वाडी येथील लहू वाघमारे यांची सुकन्या आरती हिच्या विवाह सोहळ्यप्रित्यर्थ हळदी समारंभ रविवारी (दि.27) आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आरती हिचे वरदा सुनील तटकरे कन्यादान योजनेंतर्गत गोवे ग्रामपंचायतीच्या वतीने कन्यादान करण्यात आले आहे. यावेळी आरती हिस शाल, पुष्पगुच्छ, पाच हजार रूपये, मानपत्र देऊन या योजनेचे कन्यादान करण्यात आले.

Exit mobile version