| भिवंडी | वृत्तसंस्था |
देशात व राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच भिवंडीत वेगवेगळ्या ठिकाणी दोन दिवसात दोन अल्पवयीन मुली हरवल्याच्या घटना घडल्या असून या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईबाबा मंदिर परिसरातील स्टेम वॉटर सप्लायर्स परिसरातून एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला मंगळवारी (दि.10) सकाळी 6:30 ते 11:30 वाजेच्या सुमारास गाळ्यातून कोणीतरी फूस लावून अज्ञात कारणाकरिता पळवून नेले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्या घटनेत 16 वर्षे 4 महिने वयाची अल्पवयीन मुलगी रामनगर, अंजुरफाटा येथून मंगळवारी (दि.10) सायंकाळी सहा वाजता घराबाहेर गेली. ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने नारपोली अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.