। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील मानकवली येथे 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास कर्जत मधील डोणेवाडी (जांभीवली), येथे राहणार्या इसमाचा मोटारसायकल घसरून अपघात झाला असून या अपघातात त्याचा मृत्यु झाला आहे. या अपघातात मृत व्यक्तीच्या ताब्यातील होंडा कंपनीची ड्रीम युग मोटार सायकल क्रमांक एम.एच.46 ए.एन.2269 ही कडाव बाजुकडुन गौळवाडी बाजुकडे जात असताना मौजे.कडाव मानकिवली गावचे हददीत आल्यावेळी टाटा रोडवर मोटार सायकलचा टायर घसरुन त्याचा मोटार सायकलवरील ताबा सुटला असता तो रस्त्याच्या बाजुला असलेल्या उंबराच्या झाडयाला धडकुन अपघात होऊन त्या अपघातात त्याला लहान मोठया गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्या तसेच त्यात त्याचा मृत्यु झाला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास मपोसई/श्रीमती आथणे ह्या करीत आहेत.