। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-रेवस मार्गावरील थळ येथील आरसीएफ प्रवेश द्वारासमोर आज (दि.28) कार आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात कारमधील चालक गंभीर जखमी झाला असून अलिबाग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारची ट्रकला मागून धडक लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली.

अलिबाग-रेवस मार्गावर आरसीएफ गेटसमोर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अलिबागकडून रेवस बाजूकडे जाणाऱ्या डंपरला नवगाव येथील पंकज दिपक घरत यांनी थार (एचएच-06-सिएल-0749) कारने डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कार चालक गंभीर जखमी झाला. त्याला ग्रामस्थांच्या सहकार्याने अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, डंपर चालक सुखरूप असून डंपरचेही नुकसान झाले आहे.