| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग समुद्रकिनारी एटीव्ही बाईक मोठ्या प्रमाणात आहेत.वर्दळीच्या ठिकाणी त्यांचा प्रचंड वावर वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. समुद्रकिनारी फेरफटका मारणाऱ्या वयोवृध्द पर्यटकाला एटीव्ही बाईकची शनिवारी दुपारी धडक लागली. या धडकेत पर्यटक जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी एटीव्ही चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्या बाईकची वयोवृध्दाला धडक लागली. यापूर्वीदेखील अशीच घटना घडली होती. एका उंटाला बाईकची धडक लागली होती. त्यामध्ये उंटावरील पर्यटक जखमी झाली आहेत. परवानगी नसताना हा धंदा राजरोसपणे सुरु असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.