| उरण | प्रतिनिधी |
उरण – पनवेल मार्गावरील जासई उड्डाणपुलावर दुचाकींचा भीषण अपघात झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात मोटारसायकलवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उरण बोरी येथील अनिश अनिल नायर (26) व अभिजित अरविंद भुवड (30) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेजण कामावरून घरी जात असताना अपघात झाला. अज्ञात वाहनाणे दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला असून, वाहन चालक फरार झाला असल्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे. या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उरण परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. या अपघातामुळे उरणमध्ये अपघाताची मालिका सुरूच असल्याचे दिसत आहे. या घटनेचा अधिक तपास उरण पोलीस करीत आहेत.