। अलिबाग । वार्ताहर ।
महाड येथील गांधारपाले गावाच्या नजीक असणार्या मुंबई-गोवा महामार्गावर 50 वर्षीय महिलेचा अपघात झाला. महाड येथील 50 वर्षीय राजन कुंडनकर या गांधारपाले गावाच्या नजिक मुंबई-गोवा हायवे रोडवर मोहप्रे पाट्याजवळ मोटारसायकल क्र.एम.एच.06 पी 9353 गांधारपाले माध्यमिक शाळेतून महाड येथे जात असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांना मार लागला असून त्या जखमी झाल्या आहेत व महाड ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाणे येथे मोटार अपघात दाखल करण्यात आला आहे.