| रसायनी | वार्ताहर |
दिराने वहिनीचे नग्न फोटो काढून हे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेन, सोशल मिडियावर व्हायरल करेन अशा धमक्या देऊन ब्लॅकमेल करून वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. दिराच्या या जाचाला कंटाळून अखेर या महिलेने आपल्या आई-वडिलांना सांगून रसायनी पोलीस ठाण्यात दिराच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पिडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या दिराच्या विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दिराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी हे अधिक तपास करीत आहेत.