| इंग्लंड । वृत्तसंस्था ।
इंग्लंड आणि झिम्बाब्वे हे दोन संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर 22 वर्षांनी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. इंग्लंडने क्रिकेटमध्ये दुबळ्या असलेल्या झिम्बाब्वेला अक्षरश: चिरडलं.
कर्णधार क्रेग इरविनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात 6 गडी गमवून 565 धावा केल्या आणि डाव घोषित केला. फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यानंतर 45 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात पाकिस्तानी वंशाच्या इंग्लिश गोलंदाजाने 9 विकेट घेतल्या.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या तीन खेळाडूंनी झिम्बाब्वेचं कंबरडं मोडलं होतं. ++झॅक क्राउलेने 124, बेन डकेटने 140, तर ओली पोपने 171 धावांची खेळी केली. तर मधल्या फळीत आलेल्या कर्णधार हॅरी ब्रूकने 58 धावांची खेळी केली. यासह इंग्लंडने पहिल्या डावात 6 गडी गमवून 565 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात ब्रायन बेनेटने 139 धावांची खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे डाव 265 धावांवर आटोपला आणि फॉलोअनची नामुष्की ओढावली. त्यानंतर उर्वरित धावांचा पाठलाग करताना संपूर्ण संघ हा 255 धावांवर आटोपला.