। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
समीर रिझवी याने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्लसने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील शेवट विजयाने केला आहे. दिल्लीने पंजाब किंग्सवर 6 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान 3 बॉलआधी 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दिल्लीने 19.3 ओव्हरमध्ये 208 रन्स केल्या. दिल्लीचा हा सातवा विजय ठरला.
दिल्लीची विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. केएल राहुल आणि कर्णधार फाफ डु प्लेसीस या सलामी जोडीने 55 धावांची भागीदारी केली.त्यानंतर केएल राहुल 21 बॉलमध्ये 35 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर दिल्लीने दुसरी विकेटही 10 धावांच्या अंतराने गमावली. फाफ 23 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे दिल्लीची 2 आऊट 65 अशी स्थिती झाली.
त्यानंतर करुण नायर आणि सेदीकुल्लाह अटल या जोडीने काही वेळ दिल्लीचा डाव सावरला. या जोडीने तिसर्या विकेटसाठी 28 रन्स जोडल्या. त्यानंतर
सेदीकुल्लाह 22 धावावंर बाद झाला. दिल्लीने 10.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 93 रन्स केल्या. त्यामुळे आता दिल्लीला जिंकण्यासाठी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या भागीदारी गरज होती. करुण नायर आणि समीर रिझवी या जोडीने ही भागीदारी करुन दाखवली आणि दिल्लीच्या विजयाचा पाया रचला.
करुण आणि समीर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 62 रन्सची निर्णायक भागीदारी केली. त्यानंतर करुण नायर आऊट झाला. करुणने 27 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. करुणचं हे योगदान निर्णयाक ठरलं. करुण आऊट झाल्यानंतर दिल्लीला विजयासाठी 30 बॉलमध्ये 52 रन्सची गरज होती. करुणनंतर ट्रिस्टन स्टब्स समीर रिझवची साथ देण्यासाठी मैदानात आला.
समीरने अखेरच्या षटकात चौफेर फटकेबाजी केली. तर दुसर्या बाजूने ट्रिस्टन स्टब्सने चांगली साथ दिली. समीर रिझवीने तोडफोड खेळी करत दिल्लीला विजयाजवळ आणलं. तर 20 व्या ओव्हरमधील तिसर्या बॉलवर सिक्स खेचून दिल्लीला विजय मिळवून दिला.
श्रेयसच्या अर्धशतकांचा पंच
श्रेयसने दिल्ली विरुद्ध डावातील 17 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर फोर ठोकला. श्रेयसने यासह अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसने 33 बॉलमध्ये 160.61 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसने या खेळीत 2 सिक्स आणि 5 फोर लगावले. श्रेयसचं हे आयपीएलच्या कारकीर्दीतील 26 वं तर 18 व्या हंगामातील पाचवं अर्धशतक ठरलं.