| इंग्लंड । वृत्तसंस्था ।
जो रूटने रूटने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 13 हजार धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला आहे. जो रूट सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याचा फॉर्म असाच सुरु राहिला तर कसोटीत नवा विक्रमवीर ठरेल. कसोटी क्रिकेटमध्ये जलद 13 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम यापूर्वी दक्षिण अफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर होता. त्याने 159 कसोटीत 13 हजार धावांचा पल्ला गाठला होता. पण आता हा विक्रम जो रूटने मोडीत काढला आहे. जो रूटने इंग्लंडसाठी 153 कसोटी सामन्यात 13 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. कसोटी इतिहासातील सर्वात कमी सामन्यांमध्ये 13 हजार धावा करणारा फलंदाज म्हणून विश्वविक्रम केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्या खेळाडूंच्या यादीत जो रूट पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने येत्या काही वर्षात 2915 धावा केल्या तर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम आपल्या नावावर करेल. यासाठी त्याला 2915 धावांची गरज आहे. पण यासाठी जो रूटला सातत्यपूर्ण तीन वर्षे चांगल्या फॉर्मात खेळावं लागेल.