पनवेल | वार्ताहर |
आशापुरा रियलटर्स या बांधकाम व्यावसायिक कंपनीतील भागीदारांच्या बनावट कुल मुखत्यारपत्रांचा वापर करुन कंपनीच्या नावे असलेली जमीन परस्पर नॅशनल बिल्डर्सच्या संचालकांना विकून 17 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करणार्या राकेश संघवी याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने नऊ महिन्यांनंतर अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणात मागील सप्टेंबर महिन्यामध्ये राकेश संघवी व व नॅशनल बिल्डर्सच्या तिघा संचालकांवर फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.