। अलिबाग । प्रतिनिधी ।
वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांना पोलिसांनी शुक्रवारी कारवाई करत दणका दिला. त्यांच्याकडून 1 लाख 99 हजार 700रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. रायगड जिल्हा वाहतूक शाखेच्या मार्फत जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य व जिल्हा तसेच तालुका मार्गावर पोलिस तैनात करण्यात आले. शुक्रवारी नाका-नाक्यावर वाहतूक पोलिसांनी उभ्या राहून बेशिस्त चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. हेल्मेट नसणे, वाहन वेगात चालविणे, जादा प्रवासी वाहतूक करणे अशा अनेक वाहतूकीचे नियम मोडणार्या 203 चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईने बेशिस्त चालकांना दणका देण्यात आला.