| पनवेल | प्रतिनिधी |
बांगलादेशीय बेकायदेशीररित्या पनवेल परिसरात वास्तव्य केल्याप्रकरणी तसेच त्यांना मदत करणार्या अशा सात जणांविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी कारवाई केली आहे.
करंजाडे येथील सेक्टर 6 या ठिकाणी आन्ना खातून आकाश गाझी उर्फ आन्ना रफिकुल इस्लाम खान (35) सोबत त्याची मुलगी सुरैना (5), आलो खातून इस्लाम खातून उर्फ आलो इस्माईल बिलाल डावर (31), किया आकाश गाझी उर्फ किया रफिकुल इस्लाम खान (21), रफिकुल इस्लाम खान उर्फ आकाश लतिफ गाझी (40) त्यांच्या सोबत त्यांची अल्पवयीन मुलगी मेघना खान (15), मोहम्मद इस्माईल अमिन्नोद्दीन येरुलकर (52) व फरार असलेला इस्माईल एस.आर. यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.