| पनवेल | प्रतिनिधी |
गर्दीच्या वेळी लोकलमध्ये टवाळगिरी आणि अश्लील शिवीगाळ करणाऱ्या टवाळ मुलांवर पनवेल रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. गर्दीच्या वेळी वाशी हून लोकल मध्ये काही टवाळ मुले शिरले आणि ते आई बहिनी वरून एकमेकांना अश्लील शिव्या देत होते. याच डब्यात काही महिला प्रवासी देखील प्रवास करत असल्यामुळे काही प्रवाशांनी त्या टवाळ मुलांना विनंती केली की महिला डब्यात असल्यामुळे तुमची चालू असलेली मस्ती नियंत्रित करा पण उलट त्या मुलानी विषय धक्काबुक्की पर्यंत नेला याच वेळ त्याच डब्यातून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर वाजे प्रवास करत होते. त्यांनी पनवेल रेल्वे पोलीस चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांना भ्रमणध्वनी द्वारे सदर घटनेची माहिती दिली. पनवेल स्टेशन ला गाडी येताच रेल्वे पोलीस इंगवले, सुळे मॅडम आणि वाघे आदींचे पथक सदर डब्या जवळ हजर झाले आणि त्या टवाळ मुलांच्या मुसक्या आवळत पुढील कारवाई साठी घेऊन गेले. किशोर वाजे यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.







