। खरोशी । प्रतिनिधी ।
पेण येथे महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंग असोशिएशन व रायगड जिल्हा एल्बो बॉक्सिंग असोशिएशन यांच्या विद्यमाने परशराम बाग पेण येथे यशवंत शेट्ये यांच्या स्मरणार्थ आमदार रविंद्र पाटील राज्यस्तरीय आमदार चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलीप लाड, जनार्दन जाधव, गौतम पाटील, रुपेश पाटील, एल्बो डॉ. मंदार पनवेकर, सुरेश कोळी, यशवंत माने, रविंद्र म्हात्रे, संदीप माने, प्रशांत गांगर्डे, निलेश भोसले, पियुष सदावर्ते उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन रविंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक पाटील, प्रथमेश मोकल, प्राजक्ता तेटमे, निलेश ओव्हाळ, रविना म्हात्रे, हर्षाली पेणकर, अयुष रसाळ, अशरफ अली, रितुल म्हात्रे, स्वरांगी घैसास, आयेष बेगम, स्मित म्हात्रे, मयुरेश म्हात्रे, आर्यन म्हात्रे, शितीज म्हात्रे, योगेश वैद्य, श्रुती म्हात्रे, रितेष पवार, शर्दुल बामगुडे, धैर्य पाटील, तेजश्री ऐवळे, तनीश वनारसे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.







