। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ठाणे येथे डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात अनाहत इव्हेट आणि एन. एम इंटरप्राईजेस यांच्या तर्फे कर्तृत्ववान महिलांचे महिला दिनाच्या औचित्याने सन्मान करण्यात आले त्यात रायगड जिल्ह्यातून अॅड.कादंबरी काळे यांना समाजसेवा क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मानित समाजसेवा करण्यात आले.
अॅड.कादंबरी काळे या वयाच्या 15 वय वर्षी पासून समता केंद्र सामाजिक शिक्षण संस्थेमार्फत सामाजिक काम करत आहेत. सध्या त्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कमिटी रायगड या महाराष्ट्र शासनाच्या कमीटीवर सदस्य आहेत. तसेच हुंडा दक्षता समिती रायगडच्या कमिटीवर सदस्य आहेत तसेच संपर्क बालग्राम या संस्थेच्या बांधण (पेझारी) तालुका कमिटीवर सदस्य आहेत. तसेच समता केंद्राच्या कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत असून सन 2013 पासून उत्कृष्टरित्या रायगड तसेच ठाणे जिल्ह्यातल्या कोर्टात वकिली करत आहेत. तसेच संस्थे मार्फत महिलांना मोफत समुपदेशन करत आहेत.
त्यांना सदरचा सन्मान अभिनय क्षेत्रातील शुभांगी गोखले व दिग्दर्शक सुचिता शब्बीर अनाहतच्या श्वेता वैदय व एन सम एन्टरप्राईज चे निलेश मुणगेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील नम्रता संभेराव यानाही अभिनय क्षेत्रात पुरस्कार देण्यात आला.