| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट पॅनल क्रिकेट पंच परीक्षेत रायगड जिल्ह्याचे ॲड. पंकज सुभाष पंडित (पोयनाड- अलिबाग) आणि सुयोग सुधाकर चौधरी (पनवेल) यश प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे जुलै व ऑगस्टमध्ये राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनलसाठी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा लेखी व प्रात्याक्षिक अशा दोन प्रकारे घेण्यात आली होती. यामध्ये लेखी परीक्षा 100 गुणांची तर प्रात्याक्षिक परीक्षेसाठी 100 गुण होते. एकूण अर्जदारांपैकी लेखी परीक्षेला 197 उमेदवार बसले होते, त्यापैकी 80 जणांची निवड प्रात्यक्षिक परीक्षेसाठी करण्यात आली होती.
अंतिम निकाल एमसीएतर्फे घोषित करण्यात आला. एकूण परीक्षेत 80 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची कट ऑफ लिस्ट लावण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 48 पंच उत्तीर्ण झाले. त्यात रायगडचे ॲड. पंकज पंडित आणि सुयोग चौधरी यांना 80 पेक्षा जास्ती गुण प्राप्त करून यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत.