| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्यांसाठी या अर्थसंकल्पात काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. लोकोपयोगी की लोकप्रिय घोषणा कशावर भर दिला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजित पवार यांनी विधान भवनात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सभागृहात प्रवेश केला. त्यांनंतर आता राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झालेली आहे.विविध घटकांचे लागले लक्ष.
मुंबई -
नवी मुंबईत 7 आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारणार
मुंबई आणि नवी मुंबईत वडाळा, खारघर यासह इतर ठिकाणी बीकेसीप्रमाणं व्यापारी केंद्र उभारणार
राज्याचे लॉजिस्टिक्स धोरण जाहीर करण्यात आले आहे. ५ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्यात येणार आहेत.
गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती
*औद्योगिक विकासात राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणूकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे
*जानेवारी, 2025 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाव्दारे एकूण 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले
*त्याव्दारे येत्या काळात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 16 लाख रो
*राज्याचे लॉजिस्टिक्स धोरण जाहीर करण्यात आले आहे. ५ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्यात येणार आहेत.
राज्यातील वीजदर कमी होणार
*महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे
*ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे
यामुळे, राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील.