| ठाणे | प्रतिनिधी |
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला. याप्रकरणी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे एन्काऊंटरचा तपास सीआयडी करणार आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरु केला असून सीआयडी अधीक्षक, नवी मुंबई हे तपासाचे प्रमुख असणार आहेत. सीआयडीचे पथक मंगळवारी ठाण्यात दाखल झाले असून, तपासाला सुरुवात झाली आहे.