अंधेरी पोटनिवडणूक शिवसेना -भाजपमध्ये रंगणार

। मुंबई । प्रतिनिधी ।

शिवसेना आ.रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्त जागेसाठी एकनाथ शिंदे गटाकडून दावा करण्यात आला होता. शिंदे गट या जागेसाठी आग्रही होती. मात्र या मतदारसंघातून भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. ठाकरे गटाने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिंदेंनी ही जागा भाजपला सोडली आहे. आता भाजपकडून मुरजी पटेल यांची उमेदवारी निश्‍चित आहे. त्यामुळे आता ही पोटनिवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशी होणार आहे.

Exit mobile version