| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दि.2 डिसेंबर रोजी कुणबी भवन माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. सदर वर्धापनदिन कार्यक्रमाला सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळातर्फे अध्यक्ष महादेवराव बक्कम, उपाध्यक्ष शैलेश भोनकर,सरचिटणीस शांताराम भोरावकर,खजिनदार रामभाऊ टेंबे, सदस्य काका नवगणे, राजराम वाढवळ, राजाराम टेंबे, तुकाराम शिर्के, गंगाराम उभारे, राजेंद्र नवगणे, माणगाव तालुका कुणबी समाज युवक संघटना, कुणबी समाज न्यायदान कमिटी, महिला संघटना, शहर रहिवाशी संघटना, सर्व ग्रुप अध्यक्ष व सर्व समाज बांधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
कुणबी समाजाचा वर्धापनदिन
