| पनवेल | वार्ताहर |
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल या कर्णबधीर मुलांच्या विशेष शाळेत शाळेचा 19 वा वर्धापनदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन अरविंद सावळेकर, संस्था सचिव प्रमोद वालेकर, सदस्य सुधीर कांडपिळे, राजेंद्र ठाकरे, क्लब अध्यक्ष, कल्पेश परमार, क्लब सचिव रो.हितेश राजपूत प्रकाश शृंगारपुरे, डॉ. जय भांडारकर, गुरुदेवसिंग कोहली, निलेश पोटे, शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका शैला बंदसोडे, ईनरव्हील क्लब अध्यक्षा कल्पना नागावकर, इनरव्हील क्लब संस्थापक अध्यक्षा शुभांगी वालेकर, पालक प्रतिनिधी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कर्णबधीर विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
या शाळेच्या विशेष शिक्षिका मनिषा गुंजाळ यांनी या कार्यक्रमातील सर्व संवाद साईन लॅग्वेजद्वारे विद्यार्थ्यांसमोर केला. शाळेच्या शिक्षिका अरुंधती बंदसोडे यांनी प्रस्ताविक व आभार प्रदर्शन केले.







