जाकमाता मंदिराचा वार्षिक उत्सव साजरा

पंडित पाटील, भावना पाटील यांची उपस्थिती
| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
शिस्ते, कापोली, भावे गावाची ग्रामदेवता असलेल्या जाकमाता कड्यावरील देवीचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या मंदिराच्या विकासासाठी माजी आम.पंडित पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

मंदिर परिसरात पाणीपुरवठा, स्वागत कमान,रस्ता आदी विकासकामे पंडित पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहेत. या वेळी पंडित पाटील यांच्या हस्ते नळ पाणीपुरवठा योजनेचेे उद्घाटन करण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी या मंदिराचा वार्षिक उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंडित पाटील,भावना पाटील यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली.

लकी ड्रॉमध्ये प्रथक क्रमांक बोर्लीपंचतन येथील वसुंधरा मुद्राळे यांना जाहीर झाले त्यांना फ्रीज मिळाला. क्रमांक दोनचेे बक्षीस नथुराम चोगले यांना लागुन त्यांना टिव्ही मिळाला क्रमांक 3 चे बक्षीस वसंत धनावडे यांना लागुन त्यांना मोबाईल मिळाला. व इतर ही लहान सहान बक्षिसांचे वाटप करण्यात आले. कमिटीने लकी ड्रॉ चे तिकीट खरेदी करणांर्‍यांचे,विजेत्यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version